प्रकाशित साहित्य

Literature

डॉ. सिसिलिया कार्व्हालो या बहुप्रसवा साहित्यिक आहेत.  कविता, कथा, ललितगद्य, आस्वादनपर, संशोधनात्मक, बालसाहित्य,  लोकसाहित्यविषयक, चरित्रात्मक,  आत्मचरित्र,  अनुवाद,  संपादन-संकलन अशा विविध प्रकारचं लेखन त्यांनी केलेले आहे. साहित्यविषयक लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी साहित्याच्या विविध क्षेत्रात केलेला संचार थक्क करणारा आहे आई-वडिलांकडून मिळालेली संवेदनशीलता, संघर्षमय परिस्थिती आणि मराठी भाषा-साहित्याचा अभ्यास आपल्या लेखनास कारण ठरलेला आहे. तसेच त्यातून कॅथॉलिक पंथीय मूल्यसंस्कार, मराठी संत साहित्याचा परिचय आणि अभ्यास, दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य यांनी केलेली जाणीव-जागृती,  जागतिक साहित्याचा प्रभाव, म्हणजे एकूणच साहित्य, विविध भाषा यांनी युक्त असे साहित्य, त्यातून आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध झालेले आहे, अशी त्यांची धारणा आहे. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके पुढील प्रमाणे……

कवितासंग्रह - Poetry Collections

ललितगद्यसंग्रह - Personal Essays

कथासंग्रह - Short Story Collections

संशोधनात्मक - Research

चरित्रात्मक - Biographical Writings

आस्वादनपर - Asthetical and Literary Writings

बालसाहित्य - Literature for children

आत्मकथन - Autobiography

संपादन - Editing and Compilation

vaditlya

अनुवाद - Transcreation